Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal 
मुख्य बातम्या मोबाईल

नाशिकचे कार्यालय औरंगाबादला हलविण्याची गरजच काय?

सरकारनामा ब्युरो

नाशिक : नाशिकमधील कार्यालय औरंगाबादला हलविण्याची गरजच काय? (there is no need to Nashik`s Offices shift to aurangabad) महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार समन्यायी तत्त्वाने पाणी दिले जाते. (Water distributes as per Maharashtra water authority`s regulation) त्यामुळे कार्यालयाचा मुद्दा गौण ठरतो. (Offices issue is neglcted) विनाकारण राजकारणाची गरज नाही, असे मत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.   

नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री डॅा भागवत कराड यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक झाली. त्यात नदीजोड प्रकल्पाच्या निधीसाठी महाराष्ट्रासाठी विविध अटी टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच गोदावरी खोऱ्यातील कार्यालये औरंगाबादला हलविण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांत तीव्र पडसाद उमटले. त्याबाबत श्री. भुजबळ यांनी वरील प्रतिक्रीया व्यक्त केली.  

केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चेत आलेले मुद्दे असे, मराठवाड्यासंबंधीच्या मुकणे, भाम, भावली आणि वाकी या धरणांत पिण्याच्या नावाखाली पाणी अडवले जाते. ते नाशिक व नगरच्या शेतीसाठी वापरले जाते. मुकणे, भाम, भावली आणि वाकी या धरणांचे पाणी मराठवाड्यासाठी असल्याने या धरणांचे नियंत्रण नाशिक येथील दोन उपविभागांकडून काढून ते वैजापूर विभागाकडे देण्यात यावे. पश्‍चिमेकडील पाणी पूर्वेला वळविण्यासाठी राज्य सरकारने नवीन समन्वय मुख्य अभियंता पद निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यालयाचे मुख्यालय औरंगाबादला आणावे. 

पश्‍चिमेकडील पाणी पूर्वेला वळविण्यासाठीचे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या राष्ट्रीय जलविकास अभिकरणच्या नियंत्रणाखालील विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्यात यावे. या सूचना पाण्याचा सर्वांगीण विचार करण्यापेक्षा चुकीच्या दिशेने जाण्याचा धोका वाढवतात, असे बोलले जाते. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT